Step into an infinite world of stories
4.4
Non-Fiction
"“मना समर्था..” हे गौरव नायगांवकर याचं पहिलं कमर्शियल ऑडिओ पुस्तक, जे ह्या आधी “प्रथमेश : एक पार्टनर” या नावाने e-बुक प्रकारात प्रकशित झालं आहे. 'कसं जगायचं? कसं वागायचं? माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला..' ह्या गाण्याप्रमाणे स्वतःच्या, मित्र- मैत्रिणीच्या समस्यावरं उपाय म्हणून त्यांनी विचार करून शोधलेली उत्तरं म्हणजे हे पुस्तक..... याआधी e-Book ला लाभलेलं प्रेम या ऑडीओ बुक ला देखील मिळेल अशी आशा आहे. ह्यातला दिनेश हताश झालायं. अपयशाने निराश होऊन न्यूनगंडाच्या गर्तेत सापडलाय. असा दिनेश तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडू शकतो.. तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील, मित्र मैत्रिणी कुणीही 'दिनेश' असू शकतं.....किंबहुना तुम्ही स्वतःच 'दिनेश' असू शकता! अगदीच सैरभैर होऊन जीवन संपवायच्या उद्देशाने जगणारा हा दिनेश. त्याचं पुढे काय होतं ते ह्या ऑडिओ मध्ये ऐकणं अधिक योग्य ठरेल. शीतल जोशी यांच्या आवाजाने ह्या पुस्तकाला अतिशय श्रवणीय बनवलंय, आणि पुस्तकाला खऱ्या अर्थानं पूर्णत्व लाभलं. Storytel आणि Zankar Studio ( Zankar Audio Cassettes), आणि सर्व सहाय्यक यांचेही मनपूर्वक आभार.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399333
Release date
Audiobook: 26 January 2023
Overall rating based on 3 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
English
India