Step into an infinite world of stories
4.7
Biographies
महर्षि दयानंद सरस्वती यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या भारतभूमीमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्या सिंहगर्जनेने कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या भारतीयांना जागे केले आणि आळसाच्या जागी पुरूषार्थाचा प्रकाश पसरवला. आपल्या विचारांच्या चिरस्थायी प्रचारासाठी सन १८७५ मध्ये मुंबई येथे त्यांनी “आर्यसमाज” या संस्थेची स्थापना केली आणि सत्यधर्माची पिपासा प्रत्येकाच्या हृदयात भडकून उठली. वैदिक ज्योतीने अंधकाराचा नाश केला. संपूर्ण भारतात एक अपूर्व लाट निर्माण झाली. विरोधकांद्वारे होणाऱ्या भीषण आक्रमणांना शांती आणि आश्चर्यकारक धैर्याने तोंड देत महर्षि दयानंदांनी आपल्या आत्मबलाद्वारे त्याग , तप आणि बलिदानाचा परिचय देऊन आपल्या सिद्धांतांच्या सत्यतेची साक्ष दिली नसती तर त्यांच्यानंतर ते प्रबळ आंदोलन संपूर्ण भारतात निर्माण झाले , पसरले व गावागावात आणि घराघरात पोहोचले ते कधीच दिसले नसते. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनीही आर्यसमाज हृदयापासून स्वीकारला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणारे बहुसंख्य बलिदानी ( उदा. लाला लाजपतराय, सरदार अजितसिंह, भगतसिॅह , सुखदेव, रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशनसिंह , पं. श्यामजी कृष्ण वर्मा, डॅा. गयाप्रसाद कटियार आणि असे असंख्य ) हे आर्यसमाजाचेच अनुयायी होते. आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा मुक्तिसंग्रामही आर्यसमाजानेच सुरू केला आणि हजारो आर्यवीरांनी रझाकारांच्या अन्यायाला तोंड देत देत प्राणार्पण केले. महर्षिंच्या या कार्यामुळेच त्यांना “समग्र क्रांतीचे अग्रदूत” असे म्हटले जाते. यंदाचे वर्ष हे महर्षि दयानंद सरस्वती यांचे द्विजन्मशताब्दीचे वर्ष आहे. आपण सर्वांनी त्यांचे हे जीवनचरित्र अवश्य ऐकावे आणि इतरांनाही ते ऐकावे यासाठी प्रेरित करावे.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399845
Release date
Audiobook: 26 May 2023
English
India