Step into an infinite world of stories
4.2
Biographies
प्रत्येक युद्धात हल्ल्याला प्रतिहल्ला करणाऱ्या योद्ध्याची वाहवा होत असते. तोच त्या युद्धाचा खरा नायक असतो. बाकी दिवसभर विदेशी हल्ल्याचा मारा झेलणारी, सर्व पुढे नायक ठरणाऱ्या योद्ध्यांचे संरक्षण करणारी तटबंदी तिथेच असते. स्थितप्रज्ञ. जसजसा या गौरवशाली युद्धाचा इतिहास पुढे सरकतो तसतसे योद्धे कालवश होतात. मात्र या गौरवशाली इतिहासाच्या खुणा सांगणारी, तोफगोळ्यांच्या खुणा दाखवणारी तटबंदी तशीच असते. ती या इतिहासाची साक्ष देत असते. त्यावेळी या तटबंदीचे महत्व उमजते. ही तटबंदी नसती तर आपले हे गौरवशाली योद्धे पराक्रम गाजवू शकले असते का? असा प्रश्नही आपल्या मनाला शिवून जातो. राहुल द्रविड ही अशीच अनेक तोफगोळ्यांच्या खुणा घेऊन जगणारी ऐतिहासिक भिंत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या संयमी खेळाच्या बळावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारा अवलिया! कसा होता राहील द्रविडच्या ‘द वॉल’ बनण्याचा प्रवास? जाणून घेऊया…
Release date
Audiobook: 22 December 2022
English
India