Step into an infinite world of stories
एकीकडे इसिस भारतीय पंतप्रधानांन मारायची कटकारस्थाने करतेय. त्याच वेळीस भारत अफगाणिस्तानशी असेलेल्या आपल्या राजकीय जवळीकीचा लाभ घेत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी पख्तुनीस्तान आणि बलोचीस्तानच्या स्वतंत्रतावादी बंडखोरांचा उठाव घडवून आणत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खाजगी सुपर हेर समीर चक्रवर्तीकडे एक विचित्र कामगिरी येते… काय तर येत्या तीन महिन्यात विखुरलेले खलिस्तानवादी, काश्मिरमधील फुटीरतावादी आणि आयएसआयचे उच्चस्तरीय हेर एकत्र भेटनार आहेत… ते जेंव्हाही भेटतील तेंव्हा ते भेटीचे स्थानच उडवुन टाकायची. तो ती कामगिरी स्विकारतो आणि सुरु होतो एक भयंकर कटकारस्थानांचा सापळा, थरारक आणि जीवघेण्या रहस्यांची मालिका… आणि समीरला कळते… त्याच्याशी सपशेल धोका करण्यात आला आहे. आता भारतीय पंतप्रधानांना कोणी मारले हे त्याला शोधणे भाग आहे कारण खुनाचा आळच त्याच्यावर आला आहे! इसिसचा सर्वेसर्वा बगदादीला ठार मारल्याखेरीज समीरचे समाधान होणार नाही!
कोणी रचले हे कारस्थान? बगदादी खरेच ठार मारला जातो काय, भारत बलोचीस्तान व पख्तुनीस्तानातील उठाव खरेच घडवून आणतो काय? आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि महासत्तांचे जीवघेणे राजकारण म्हणजे "धोका" ही कादंबरी.
अवश्य ऐका… जीवघेणा थरार आणि रहस्याच्या विलक्षण जाळ्यात दंगून जा.
Samir meets with Hector to plan for the mission. Andre is missing and Samir finds out that he is in Qatar.
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9789386679185
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9789352840137
Release date
Audiobook: 12 October 2017
Ebook: 15 November 2017
English
India