Step into an infinite world of stories
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे क्रांतीकार्य सर्वांना माहिती आहे. हिंदुह्रदय सम्राट म्हणून ते जनमानसात ओळखले जातात. महाकवी सावरकर म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. नाटककार, साहित्यकार सावरकर म्हणूनही त्यांना मान्यता आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि विज्ञाननिष्ठ विचार आणि अस्पृश्यता निवारणाच्या त्यांच्या कार्यांची ओळखही अनेकांना आहे. पण मराठी भाषा शुध्दी साठी त्यांनी केलेले कार्य फार कमी जणांना माहिती आहे. सावरकरांनी आपल्या भाषाशुध्दी लेखांतून स्वकीय भाषा आणि परकिय भाषा यांचा उहापोह केलेला आहे. आपण आपल्या स्वकीय भाषा समृध्द असूनही जेव्हा परकिय भाषेतील शब्दांचा वापर करतो तेव्हा ती एका अर्थाने गुलामीच असते त्यामुळे मराठी भाषा बोलताना जिथे इंग्रजी, फारसी शब्द येतात तेथे पर्यायी शब्द म्हणून संस्कृत किंवा कोणत्याही भारतीय भाषेतील शब्द वापरावेत असा त्यांचा आग्रह होता. अनेक नवे शब्द त्यांनी मराठीत रूढ केले. भाषाशुध्दी बद्दलचे त्यांचे स्पष्ट विचार आपल्याला या लेखातून कळतात आणि त्यांची भूमिका किती विवेकी होती हे समजते.
Release date
Audiobook: 27 November 2024
English
India