Step into an infinite world of stories
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रदेशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव! पंढरपूरची यात्रा आणि विठ्ठल हा पारंपरिक मराठी समाजमानसाचा सगळ्यात महत्वाचा मानबिंदू आहे. महाराष्ट्रभरातून शेकडो पालख्या ‘ग्यानबा तुकारामचा’ अखंड जयघोष करत आषाढी एकदशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात. चंद्रभागेचा काठ भक्तिरसात न्हाऊन निघतो. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म.. भेदाभेद भ्रम, अमंगळ… हा बीजमंत्र घेऊन वारकरी जन विठोबाच्या चरणी लीन होतात. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा अव्याहतपणे चालत आली आहे. पंढरपूरच्या विठोबाकडे आणि आषाढीच्या वारीकडे असं कोणतं संचित आहे, की जे महाराष्ट्रावर इतकी संकटं, परकीय आक्रमणं येऊनही टिकून राहिलं? मुळात विठ्ठल या दैवताचा इतिहास काय? या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत…
Release date
Audiobook: 4 July 2022
English
India